अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवा ; या संघटनेने केली मागणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ वतीने घेण्यात आलेल्या परीक्षा संदर्भात घोळ सुरूच आहे . याच पार्श्वभूमीवर इंजिनीअरिंग कृती समितीने नुकतेच विद्यापीठाद्वारे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत येणाऱ्या सुट्टी बाबत निवेदन दिले आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
दि. ०५ ऑक्टोबर २०२० रोजी पासून परीक्षेचे कामकाज सुरू झाले आहे, या निर्णयामुळे समस्त विद्यार्थी वर्ग आनंदात आहे.परंतु, या परीक्षा देत असताना बहुतांशी विध्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.ज्यामध्ये वारंवार ‘502 BAD GATEWAY ERROR’ अश्या प्रकारचा एरर येणे, परीक्षेची वेळ संपण्याआधीच किंवा सर्व प्रश्न सोडवण्या आधीच ‘THANK YOU, YOUR EXAM IS ENDED’ असा संदेश स्क्रीन वर दिसणे. विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असताना देखील ‘ABSENT’ असा शेरा दिसणे,विद्यापीठाने वेळापत्रकामध्ये दिलेल्या वेळेनुसार परीक्षा सुरू न होणे.अशा परिस्थिती मुळे विद्यार्थी वर्गात संभ्रमाची लाट उद्भवली आहे.
विद्यापीठांच्या परीक्षा घेताना येणाऱ्या टेक्निकल समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे वेळेचे आणि अभ्यासाचे नियोजन विस्कळीत होत आहे. अश्या परिस्थिती मुळे समस्त विद्यार्थी वर्ग निराशेच्या छायेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रमोद खटके,उपाध्यक्ष,
इंजिनीअरिंग कृती समिती सोलापूर जिल्हा.