सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील गावांमध्ये
केवळ 2 दिवसात हाताला आलेलं पीक डोळ्यासमोर पुराच्या पाण्याने नासलेले बळीराजाने बघितलं तर राहत्या घरात पाणी घुसल्याने संसार उघड्यावर पडला याची दखल घेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वड्डेटीवार यांना अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची निवेदन देऊन माहिती दिली. आणि तात्काळ पंचनामे करून त्वरीत मदत देण्यात यावी. अशी मागणी यावेळी केली.
अतीवृष्टीमुळे आणि नदीच्या पुरामुळे 14 आणि 15 ऑक्टोंबर रोजी मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने 81 गावांमध्ये घरांची पडझड झाली असून स्थानिक रहिवाशांची घरे बाधित झाली आहेत. त्यामुळे या 81 गावांमध्ये पडझड झालेल्या 629 घरांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे .बाधित गावांमधील पिकांचे त्वरित पंचनामे करावे. तूर, मका, सोयाबीन व इतर कडधान्याला हेक्टरी 25 हजारांची मदत देण्यात यावी, उसाचे पंचनामे करून हेक्टरी 50 हजार मदत द्यावी, तसेच द्राक्षे व फळबागांना हेक्टरी दीड लाख एवढी मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
आज सोमवारी अक्कलकोट येथे पूरस्थितीमुळे दयनीय अवस्था झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर दौरा आयोजित केलेला होता.
बोरी नदीच्या पुलावरून मुख्यमंत्र्यांनी सांगवी (खुर्द) येथील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली.
Leave a Reply