Latest Post

Ставки по Линии Ставки на Спорт Online ᐉ «1xbet» ᐉ Md 1xbet Co “ücretsiz Slot Oyunları Silvergames’te Çevrimiçi Oynayın

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.

दि. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, दि. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी दि. 21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.

यांच दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ही सहभागी असणार आहेत या दोन नेत्यांच्या टेंभुर्णी संयुक्त दौऱ्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब करमाळा परांड्या कडे रवाना होतील तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पंढरपूर येथे पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यारा करतील सायंकाळी मुक्काम सोलापूर येथे मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:00 ते 11:00 या वेळेत अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी करतील 11:00 वाजता जिल्हाधिकारी यांच्यासोबत पूर परिस्थितीबाबत जिल्ह्यातील खासदार आमदार पदाधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली 12:00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद नंतर सोयीनुसार पुढे रवाना होते.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दुपारी 1:00 वाजता सोलापूर जिल्हा हद्दीत सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर ला दुपारी 1:00 वाजता येणार आहेत यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार जिल्हा भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *