Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सुप्रसिद्ध योगगुरु रामदेवबाबा एका सजवलेल्या हत्तीवर बसून भ्रामरी प्राणायम, योगासने करत असताना तोल जाऊन खाली पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. मात्र सुदैवानं रामदेवबाबा यांना कोणतीही दुखापत झालेली नाही असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मथुरा येथील महावन रमणरेतीच्या गुरु शरणानंद आश्रमात योगगुरू रामदेवबाबा उपस्थित संताना योगासने शिकवीत होते. त्यावेळी ते आश्रमातील हत्तीवर बसून योगासने करत होते. अचानक हत्ती हलल्याने रामदेवबाबा यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. मंगळवारी या संदर्भात २२ सेकंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून त्यात रामदेवबाबा हत्तीवरून पडल्याचे दिसत आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांना हत्तीवर बसून प्राणायाम करणे चांगलेच महागात पडले. प्राणायाम करत असताना हत्ती असंतुलित झाल्याने बाबा रामदेव जमिनीवर आदळले. दरम्यान, त्यांना कोणतीही इजा झाली नाही, परंतु काही क्षणांसाठी तिथे उपस्थित लोकांना घाम फुटला. ही घटना गोकुळ रामनराती येथे असलेल्या कारशनी गुरुशरणानंदच्या आश्रमात सोमवारी घडली.

बाबा रामदेव योग कार्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच अनुषंगाने सोमवारी योग प्रशिक्षणादरम्यान त्‍यांची संत गुरुशरणानंदांच्या सुशोभित व सुंदर हत्तीकडे त्यांची नजर गेली. पूजा केल्यामुळे हा हत्ती बराच काळ आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *