आज ग्रामीण भागात निगेटिव्ह 2799 तर नवे बाधित 152

आज गुरुवारी दि. 5 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 152 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 92 पुरुष तर 60 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 141 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2951 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2799 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 727 इतकी झाली आहे. यामध्ये 19,598 पुरुष तर 12,129 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 941 जणांचा मृत्यू झाला आहे यात 672 पुरुष तर 269 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 789 आहे .यामध्ये 1 हजार 361 पुरुष तर 428 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 28 हजार 997 यामध्ये 17,565 पुरुष तर 11,432 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 9

बार्शी –नागरी 3 तर ग्रामीण 4

करमाळा –नागरी 2 ग्रामीण 2

माढा – नागरी 3 तर ग्रामीण 19

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 27

मंगळवेढा – नागरी 5 ग्रामीण 4

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 9

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 9 ग्रामीण 40

सांगोला – नागरी 4 ग्रामीण 9

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

आजच्या नोंदी नुसार नागरी – 27 तर ग्रामीण भागात 125 असे एकूण 152 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.