Latest Post

Ставки по Линии Ставки на Спорт Online ᐉ «1xbet» ᐉ Md 1xbet Co Aviator ️ Play The Particular Game Now And Win Big Using Aviator Predictor

आज रविवारी दि.15 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 77 पुरुष तर 36 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 148 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 914 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 801 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 33 हजार 214 इतकी झाली आहे. यामध्ये 20,507 पुरुष तर 12,707 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 984 जणांचा मृत्यू झाला आहे यात 704 पुरुष तर 280 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 849 आहे .यामध्ये 1 हजार 362 पुरुष तर 487 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 30 हजार 381 यामध्ये 18,441 पुरुष तर 11,940 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 9 तर ग्रामीण 2

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 1

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 17

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 29

मंगळवेढा – नागरी 2 ग्रामीण 0

मोहोळ – नागरी 2 ग्रामीण 8

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 10 ग्रामीण 23

सांगोला – नागरी 4 ग्रामीण 5

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

आजच्या नोंदी नुसार नागरी – 28 तर ग्रामीण भागात 85 असे एकूण 133 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *