Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सोलापूर शहरात आज रविवारी दि.29 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 25 रुग्ण आढळले असून यामध्ये 14 पुरुष तर 11 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 34 इतकी आहे.

आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 658 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 633 निगेटीव्ह आहेत.

आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,360 असून एकूण मृतांची संख्या 561 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 429 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 9370 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *