सोलापूर शहरात आज बुधवारी दि.21 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 19 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 45 इतकी आहे.
आज बुधवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 373 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 357 निगेटीव्ह आहेत. आज 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9325 असून एकूण मृतांची संख्या 520 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 595 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8210 इतकी आहे
साबळे यूपीएससी जवळ, भवानी पेठ परिसरातील अज्ञात व्यक्ती, आशा नगर एमआयडीसी ,संकेत ठोंबरे नगर वसंत विहार, गोंधळी वस्ती,स्वागत नगर कुमठा नाका, अंत्रोळीकर नगर भाग नंबर 2 ,ओंकार हाउसिंग सोसायटी मजरेवाडी, निर्मिती विहार, गोंडे नगर, टिळक चौक उत्तर कसबा, विजयालक्ष्मी नगर नई जिंदगी, सर्वोदय अपार्टमेंट वसंत विहार, गंगाधर हौसिंग सोसायटी या परिसरातील व्यक्ती बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे
तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे यामध्ये भवानी पेठ परिसरातील अनोळखी व्यक्ती मृत असून ते 52 वर्षाचे पुरुष आहेत .19 ऑक्टोंबर रोजी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले. दुसरी व्यक्ती बसवेश्वर नगर परिसरातील 69 वर्षाचे पुरुष असून तिसरी व्यक्ती धोंडीबा वस्ती परिसरातील गैबी नगर मधील 56 वर्षाचे पुरुष आहेत