Latest Post

Ставки по Линии Ставки на Спорт Online ᐉ «1xbet» ᐉ Md 1xbet Co Aviator ️ Play The Particular Game Now And Win Big Using Aviator Predictor

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज 25 मार्च रोजी नवीन सुधारित आदेश लागू केले आहेत.
आज नव्याने काढलेला सुधारित आदेश हा आजपासूनच लागू केला जाणार आहे. हा आदेश 31 मार्चपर्यंत काढला आहे. 31 मार्चनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी या आदेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केलं आहे.

या आदेशातून अत्यावश्यक सेवा/मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व फळे, किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना या आदेशातून सुट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या या सुधारित आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या वेळेत चालू राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे व बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात आले आहेत. खाद्यगृह, परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत कोव्हिडच्या नियमांचे पालन करून 50 टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

होम डिलिव्हरीसाठी किचन व वितरण कक्ष रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम, व्यायाम शाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्याकडे लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार नियोजन करावे. एका दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता शेत मालाच्या प्रकारानुसार लिलावाचा दिवस व वेळ विभागून द्यावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. बाजार समित्यांमधील लिलावाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपविण्यात आली आहे.
आजच सोलापूर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर सुधारित आदेश लागू करतील असे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *