सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्रात सर्व सुविधा सुरू आहेत परंतु अद्यापही आधार कार्ड सेवा सुरू नाही त्यामुळे ही सेवा सुरू करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
सोलापुरात अनेकांना नवीन आधार कार्ड नोंदणी तसेच आधार कार्ड दुरुस्ती करून घ्यायचे आहे. परंतु ,शहरात आधार कार्ड संबंधित सेवा चालू नसल्याने वेळी कामगार पेन्शन, पीएफ फंड, शेतकरी वर्ग, मुलांच्या ऍडमिशन, स्कॉलरशिप, परीक्षा फॉर्म व बँक संबंधित कामांना अडचण निर्माण झाले असल्याच निवेदनात नमूद करण्यात आले आहे तरी जिल्हाधिकारी यांनी लोकांच्या अडीअडचणी ची तात्काळ दखल घेऊन नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती सेवा सुरू करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने आज बुधवारी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना शहराध्यक्ष असलम शेख, इमरान मुजावर, मोईन सगरी उपस्थित होते.