सोलापूर, प्रतिनिधी
गुजरात येथील आहे आयेशा खान यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कडक कायदेशीर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आज गुरुवारी देण्यात आले.
आयेशा खान ही गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद शहरातील मोहल्ल्यामध्ये राहणारे 23 वर्षाची तरुणी होती. तिला तिच्या सासरच्या लोकांनी लग्न झाल्यावर काही दिवसांनी पैशाची मागणी करत होते. प्रत्येक वेळेस तिच्या वडिलांनी त्यांची मागणी येन केन प्रकारे पैसे गोळा करून देत असत. मात्र वारंवार पैशाची मागणी करून आयेशाला त्रास देणे सुरुच होते. या सर्वांना कंटाळून आयेशाने आत्महत्या केली. आरिफ खान व त्याचे सर्व कुटुंब या लोकांनी ह्यामध्ये भाग घेतला त्या सर्वांना जबाबदार धरून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून पुन्हा आरिफ खान जन्माला येऊ नये अशी निर्लज्ज कृती करून एखाद्या विनाकारण जीवाशी खेळून कोणताही जीव आत्महत्या करणार याची दखल घ्यावी. अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, गौस पिरजादे, सैपन शेख, अजहर पठाण, समीर फानेबंद, सलिम मुलानी आदी उपस्थित होते.
Leave a Reply