भारत सरकारच्या आयुष मंत्रालयावर आयुर्वेदतज्ञ डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुर्वेद शास्त्रातील योगदान आणि त्या ज्ञानाचा देशातील आरोग्यासाठी धोरणात्मक उपयोग व्हावा याकरिता ,
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत नुकतीच संपूर्ण देशातून चार आयुर्वेद तज्ज्ञांना नाम निर्देशित केले.त्यात पद्मभूषण डॉ.त्रिवेदी,
डॉ,डोईफोडे,डॉ,पद्मा श्रीवास्तव, आणि डॉ.शिवरत्न शेटे यांचा समावेश आहे,
आयुर्वेद चिकित्सेतील वेगवेगळ्या आजारांवर हजारो रुग्णांवर केलेल्या यशस्वी चिकित्सेच्या अनुभवाचा फायदा तसेच आयुर्वेदाची राष्ट्रव्यापी आरोग्य विषयक लोकोपयोगी धोरणं ठरविण्यासाठी निश्चितच उपयोग होणार आहे.
2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
एम्स च्या धर्तीवर आयुर्वेदाचेही मोठ-मोठे हॉस्पिटल असावेत अशी भावना व्यक्त केली होती.
जगातील पहिले वैद्यकीय शास्त्र आयुर्वेद हे जागतिक पातळीवर सिद्ध व्हावे,याकरिता दिल्ली मध्ये भव्यदिव्य ,आयुष मंत्रालय अंतर्गत स्वायत्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान उभारले आहे.असेच आयुर्वेद हॉस्पिटल गोव्यासह प्रत्येक राज्यात नियोजित आहेत.
आयुर्वेद ही दुष्परिणाम रहित भारतीय चिकित्सा पद्धती असल्याने स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि स्वतंत्र केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी अथक मेहनत घेऊन आयुर्वेद शास्त्रास राजाश्रय देऊन न्याय दिला आहे.
आयुर्वेद शास्त्राची सेवा देशाची राजधानी दिल्लीत करण्याची संधी या आयुष नियुक्ती मुळे प्राप्त झाली आहे,सर्वांना अभिमान वाटेल अशीच सार्थ कामगिरी करणार असे डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले.
किल्लेभ्रमंती आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या व्याख्यानाद्वारे गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने गाजविणाऱ्या ,आणि हिंदवी परिवाराच्या गड भ्रमंती मोहिमांच्या माध्यमातून आजवर लाखों आचरणकर्ते शिवभक्त घडवून राष्ट्रबांधणी करणाऱ्या डॉ. शेटे यांची केंद्रीय पातळीवर दखल घेतल्याने त्यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.