कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद सोलापूर जिल्हा कार्यकारिणी निवड व सहविचार सभेचे उद्घाटन समारंभ कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा.सुनील शिंदे सर, अध्यक्ष प्रा. रंगनाथ कांगणे सर, समस्त पदाधिकारी, पुणे जिल्हा पदाधिकारी, अहमदनगर जिल्हा पदाधिकारी, इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील शिंदे यांची निवड पुणे विभागीय सहकोषाध्यक्ष प्रा. प्रशांत नागुरे सर यांनी केले. तर अनुमोदन प्रा. उत्तम कुसमुडे पुणे विभागीय सदस्य यांनी केले. प्रमुख अतिथींचे स्वागत जिल्हा सदस्य प्रा. जैनुद्दिन पटेल यांनी केले तदनंतर नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी स्वपरिचय करून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा. संजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तदनंतर प्रा. विजयकुमार भवारी पुणे, प्रा.जनार्दन खेडकर , नगर, प्रा. सुनंदा कर्पे प्रा.मुकुंद सावळकर सर पुणे, प्रा. स्मिता जयकर मॅडम नाशिक. प्रा डॉ. शिवानी लिमये पुणे, प्रा संतोष कुमार रंगदळ लातूर. प्रा.भुजाबा माने पुणे आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीला उद्देशून मनोगत व्यक्त केले. मुख्य अतिथी म्हणून राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. माननीय सुनील शिंदे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर व्याख्यानांमध्ये इतिहास परिषदेची निर्मिती कोणत्या उद्देशाने झाली हे स्पष्ट केले तसेच जिल्हा कार्यकारणी स्थापन करून इतिहास विषयाचे व्हिडिओ, नोट्स आदी यांची निर्मिती व त्यांचा दर्जा याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले त्या पुढे म्हणाले की, या जिल्हा कार्यकारणी च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 250 इतिहास विषय शिक्षक जोडले आहेत त्यांचा ज्ञानाचा फायदा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून इतिहास विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना होईल.
कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य मार्फत कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शिक्षकांना एकत्रित येण्यासाठी व इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांना विषयामध्ये आवड निर्माण करण्यासाठी राज्य कार्यकारणी महत्त्वाची भूमिका बजावेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केले. सर्व शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून नवनवीन शैक्षणिक साहित्य निर्मिती करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शेवटी जिल्हा कार्यकारणी मध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील नूतन जिल्हा कार्यकारणीतील अध्यक्ष प्रा. संजय जाधव, उपाध्यक्ष प्रा. गंगाधर घोंगडे, सचिव प्रा. शंकर कोमुलवार, सहसचिव प्रा. विलास भोसले, कोषाध्यक्ष प्रा. चंद्रकांत देवकते, सहकोषाध्यक्ष प्रा. सतीश माने देशमुख, व इतर सदस्य प्रा. मोहन शिनगारे, प्रा, गुरुपादप्पा गोरनाळे, प्रा. महादेव थोरात, प्रा.संतोष नरे, प्रा.नरेंद्र शिंदे. प्रा.जैनुद्दिन पटेल, प्रा, रवीकिरण वाघमोडे, महिला प्रतिनिधी सदस्या प्रा. पुष्पा विभुते मॅडम, प्रा. मीनाक्षी मेंडपल्ली मॅडम, आदींची निवड करण्यात याप्रसंगी पुणे विभागीय उपाध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, सहकोषाध्यक्ष प्रा. प्रशांत नागुरे सर , सदस्य प्रा. श्रीधर सगेल सर, सदस्य प्रा उत्तम कुसमुडे , आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा सचिव प्रा. शंकर कोमुलवार यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीधर सगेल सर यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तंत्र सहाय्यक प्रा. लक्ष्मीपुत्र मैंदर्गी . प्रा. लक्ष्मण महाडिक आदी मान्यवरांच बहुमोल सहकार्य लाभले.