उपमहापौर काळे आणि उपायुक्त पांडे यांच्या वादाशी संबंध नाही

उपमहापौर राजेश काळे व उपायुक्त धनराज पांडे यांच्यातील वाद हा मनपातील आरोग्य विभाग व इतर प्रशासकीय कामातील अनियमितता व बेकायदेशीर कामाबाबत आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याला मनपाने शासकीय नियमानुसार सर्व सहकार्य केले आहे. आम्ही याबाबत काळे यांच्याकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. त्यामुळे या वादाचा आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या विवाह सोहळ्याचा काहीही संबंध नाही, असे लोकमंगलने म्हटले आहे.

उपमहापौर राजेश काळे यांनी मनपाचे उपायुक्त धनराज पांडे व झोन अधिकारी नीलकंठ मठपती यांना शिवीगाळ केल्यामुळे काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार त्यांच्या कामावरून घडला आहे. मात्र विनाकारण या घटनेमुळे लोकमंगल फाउंडेशनच्या सामजिक चळवळीवर टीका होत आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यास महापालिका व पोलीस प्रशासनासह सर्व प्रशासकीय यंत्रणा लोकमंगलला नेहमीच नियमाप्रमाणे सहकार्य व मदत करत असते. यावेळीही त्यांनी सर्व मदत केली आहे. आमची मनपाच्या विरोधात कुठली तक्रार नव्हती. उपमहापौर राजेश काळे यांना विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी नियम डावलून बेकायदेशीर काम करा म्हणून फाउंडेशनच्यावतीने कोणीही तक्रार केली नव्हती. या सर्व प्रकरणात विवाह सोहळ्याचा काहीही संबध नाही. विनाकारण लोकमंगल फाउंडेशनची बदनामी करून असे, असे लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे