मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राचा असून खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपाने राज्यसभेत कसे काय पाठविले ?असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक राजा बिनडोक असल्याची जहरी टीका केली आहे. यावर मराठा नेत्यांनी या आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल निषेध व्यक्त केला आहे.दोन्ही राजांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे.
दरम्यान, खासदार संभाजीराजे भोसले हे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर भर देत असतात असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले.याचाही निषेध व्यक्त केला जात आहे.
एकीकडे मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडेे टीका करायची याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा करावा असे आवाहन विनोद पाटील तसेच माथाडी कामगार समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
10 तारखेच्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा तारखेला पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
Leave a Reply