Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13 News Network

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 118 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज रविवारी दि.14 मार्च रोजी ग्रामीण भागातील 118 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 74 पुरुष तर 44 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 40 आहे. यामध्ये पुरुष 24 तर 16 महिलांचा समावेश होतो .आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3034 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2916 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 41 हजार 604 इतकी झाली आहे. यामध्ये 25,888 पुरुष तर 15,716महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
दोघांचा मृत्यू
माळशिरस येथील मोटेवाडी परिसरातील 75 वर्षीय पुरुष तर दुसरी व्यक्ती मंगळवेढा येथील होनमाने गल्ली येथील 83 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1198 जणांचा मृत्यू झाला आहे यात 861 पुरुष तर 337 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 850 आहे .यामध्ये 528 पुरुष तर 322 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 39 हजार 556 यामध्ये 24,499 पुरुष तर 15,057 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 1

बार्शी –नागरी 21 तर ग्रामीण 8

करमाळा –नागरी 2 ग्रामीण 16

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 24

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 9

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 1

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 4

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 8 ग्रामीण 13

सांगोला – नागरी 2 ग्रामीण 4

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3

आजच्या नोंदी नुसार नागरी -35 तर ग्रामीण भागात 83 असे एकूण 118 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *