केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती

 

 

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतात देखील त्याचं प्रमाण वाढत आहे. या घातक आजरामुळे आतापर्यंत बर्‍याच लोकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. देशातील अनेक नामांकित व्यक्तींबरोबरच काही केंद्रीय मंत्रीदेखील या आजाराला बळी पडले आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (covid positive) याबाबत स्वत: स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जे लोकं माझ्या   माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वत:ची तपासणी करुन घ्यावी. ही विनंती.

 

यापूर्वी गृहमंत्री अमित शहा, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि इतरही काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीरित्या त्यावर मात केली.