कोरोनाची दुसरी लाट | शहरात वाढले तब्बल 138 पॉझिटिव्ह ; या परिसरातील…

कोरोना संसर्गाची बाधा कमी होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असताना विशेष म्हणजे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज बुधवारी दि. 17 मार्च रोजी कोरोनाचे नवे 138 रुग्ण आढळले असून यामध्ये 85 पुरुष तर 53 स्त्रियांचा समावेश आहे.

आज बुधवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1117 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 979 निगेटीव्ह तर 138 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 16 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

बाधित व्यक्ती…

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13,409 असून एकूण मृतांची संख्या 677 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 847 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 11,885 इतकी आहे.

महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत नागरिकांनी आजारपण अंगावर काढू नये. वृद्धांची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे, मास्क वापर करावा अशा सूचना देण्यात येतात.