कोरोना संसर्गाची बाधा कमी होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असताना विशेष म्हणजे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
सोलापूर शहरात आज रविवारी दि. 28 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले असून यामध्ये 18 पुरुष तर 12स्त्रियांचा समावेश आहे.
आज रविवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 693 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 663 निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 81 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बाधित व्यक्ती…
कन्ना चौक, वसुंधरा महाविद्यालय जवळ , वारद चाळ मुरारजी पेठ, आळंदकर चाळ रेल्वे लाईन्स, पार्श्वनाथ अपार्टमेंट बुधवार पेठ, राजस्व नगर विजापूर रोड, समर्थ हौसिंग सोसायटी विजापूर रोड, आदित्य नगर समर्थ हाउसिंग सोसायटी विजापूर रोड , सोनिया नगर विजापूर रोड, विवेकानंद नगर विजापूर रोड, जुना कुंभारी नाका राघवेंद्र टॉवर जवळ, निर्मिती विहार विजापूर रोड ,गांधी नगर अक्कलकोट रोड, लक्ष्मी मार्केट दक्षिण कसबा ,रामराज्य नगर शेळगी ,विजय देशमुख नगर विजापूर रोड ,भवानी पेठ ,जवाहर अपार्टमेंट कामत हॉटेल जवळ, शेळगी गावठाण, सत्यम शिवम सुंदरम अपार्टमेंट सम्राट चौक, जुनी मिल जवळ मुरारजी पेठ, राईजवन अपार्टमेंट होटगी रोड, वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह
या भागातील पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तिघांचा मृत्यू…
सिव्हिल चौक परिसरातील सिद्धार्थ नगर भागातील 42 वर्षाचे पुरुष 15 फेब्रुवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 27 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता त्यांचे निधन झाले.
तर दुसरी मयत झालेली व्यक्ती अंत्रोळीकर परिसरातील 79 वर्षाचे पुरुष असून 18 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांना सीएनएस हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 27 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.
तर तिसरी व्यक्ती ही साईनाथ नगर होटगी रोड परिसरातील 53 वर्षाची महिला आहे. त्यांना चार फेब्रुवारी रोजी नवनीत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे निधन झाले अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12,417 असून एकूण मृतांची संख्या 659 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 399 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 11,359 इतकी आहे.
महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत नागरिकांनी आजारपण अंगावर काढू नये. वृद्धांची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे, मास्क वापर करावा अशा सूचना देण्यात येतात.