– जिल्ह्यातील गरीब, वंचितांना शिवभोजनचा आधार
– सोलापूर जिल्ह्यात 30 शिवभोजन केंद्र
– जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांची माहिती
सोलापूर, प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, कामगार वर्ग, शेतकरी, मजूर , विद्यार्थी उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन थाळीची सुरुवात करण्यात आली होती. कोरोना काळात जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील 30 शिवभोजन थाळी केंद्रावर 1 लाख 32 हजार गरजूंनी लाभ घेतला. तर आतापर्यंत एकंदरीत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे सोलापूर जिल्ह्यातील गरजू, गरिबांना आधार मिळतोय एवढं मात्र निश्चित.
राज्यातील गरीब, शेतकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी, होतकरू व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्यात शिवभोजन थाळीची सुरुवात केली. सुरुवातीस ही थाळी दहा रुपयात करण्यात आली होती. सोलापूरसह राज्यातील विविध शहरात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान कोरोनामुळे शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्यात आली. व त्याची किंमत 10 रुपयावरून 5 रुपये करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात ही योजना सुरुवात करण्यात आली. यासाठी शहरी भागात प्रति थाळी 45 रुपये, ग्रामीण 30 प्रतिथाळी शासन देणार आहे.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यात एकूण 30 केंद्रावर दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत पाच रुपयात शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. शहरात 7, तालुक्यात 23 केंद्रावर शिवभोजन थाळीचा लाभ नागरिक घेत आहेत. सोलापूर दररोज 2200 थाळीची संख्या असणार आहे. कोरोना काळात 1 लाखाहुन अधिक गरजू लोकांनी लाभ घेतला. दररोज सुमारे 2 हजारहुन अधिक नागरिक या थाळीचा लाभ घेत आहेत. एकंदरीत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू व भुकेलेल्यांना नागरिकांना पोटाची भूक भागवतेय असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शिवभोजन थाळीचा तपशील पुढीलप्रमाणे-
– जिल्ह्यात शिवभोजन केंद्र – 30
– शहरात 7 केंद्रावर 1 हजार थाळी, ग्रामीण भागात 23 केंद्रात 2500 थाळी
– थाळी- 5 रुपयात
– कोरोना काळात- 1 लाख 32 हजार जणांनी घेतला लाभ
शिवभोजन थाळीस चांगला प्रतिसाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यात शिवभोजन थाळीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.जास्तीत जास्त पॅकेटकरून थाळीचे वितरण करा तसेच एकमेकात 3 फुटाचा अंतर ठेवण्याचे सांगण्यात आले. थाळी देताना तोंडावर मास्क, हातात ग्लोज घालून थाळी देण्याची सूचना देण्यात आली आहे.
अनिल कारंडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी