Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आज रविवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 535 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 516 निगेटीव्ह तर 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 6 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. आज 1 जणाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…
शुक्रवार पेठ, स्वामी विवेकानंद नगर मजरेवाडी, समर्थ नगर जुळे सोलापूर, नवोदय नगर मजरेवाडी, विकास नगर, कल्याण नगर, सुरवसे नगर कुमठा नाका, अंबिका नगर कुमठा नाका, अवंती नगर मुरारजी पेठ, सोलापूर कारागृह, गडगे नगर, सम्राट चौक, निखील पार्क आर.टी.ओ. कार्यालयाजवळ, विडी घरकुल, वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांचे वस्तीग्रह, माधव नगर या परिसरातील चौदा पुरुष आणि पाच महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,958 असून एकूण मृतांची संख्या 590 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 285 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10083 इतकी आहे.

मुरारजी पेठ परिसरातील 76 वर्षांची महिला 12 डिसेंबर रोजी सकाळी अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाली होती उपचारादरम्यान 26 डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

हे आहे महत्वाचे

 

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *