Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

कोळा (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचेकडून फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इ.5 वी आणि इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत कोळा विद्यामंदिर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर प्राविण्य राखत उज्ज्वल यश संपादन केले आहे.इ.5 वी मधील 28 विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थी पात्र झाले असून एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर इ.8 वी मधील 22 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी पात्र झाले असून 8 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
यामध्ये कुमार हर्षवर्धन बाजीराव आलदर (इ.5 वी-जिल्हा ग्रा.195 वा),कुमार रोशन जयवंत आलदर (इ.8 वी-जिल्हा ग्रा.65 वा),कुमारी पूनम बाबासो आलदर (इ.8 वी-जिल्हा ग्रा.69 वी),कुमार विशाल विश्वेश्वर साखरे (इ.8 वी-जिल्हा ग्रा.70 वा),कुमार चैतन्य मधुकर सरगर (इ.8 वी-जिल्हा ग्रा.100 वा),कुमार भागवत रखमाजी कोळेकर (इ.8 वी-जिल्हा ग्रा.125 वा),कुमारी भक्ती वसंत बंडगर (इ.8 वी-जिल्हा ग्रा.198 वी),कुमारी दिव्या दत्तात्रय मदने (इ.8 वी-जिल्हा ग्रा.257 वी),कुमारी स्नेहल मारुती कोळेकर (इ.8 वी-जिल्हा ग्रा.301 वी) या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त केली आहे.
या विद्यार्थ्यांना इ.5 वीसाठी विभागप्रमुख ए.जी.सरगर यांच्यासह

व्ही.व्ही.कोठावळे,आर्.एस्.आलदर,एन्.व्ही.देशमुख,एस्.ए.नागरसे,आर्.आर्.गळवे आणि इ.8 वीसाठी विभागप्रमुख एन्.डी.कांबळे यांच्यासह बी.एस्.माने,डी.पी.सांगोलकर,एम्.आर्.सरगर,एस्.बी.बुंजकर,एस्.व्ही.कोळेकर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म.शं.(तात्या) घोंगडे,खजिनदार शं.बा.सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब तसेच कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके साहेब यांच्यासह मुख्याध्यापक नारायण विसापुरे,पर्यवेक्षक लक्ष्मण जांगळे,संस्था बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नरेंद्र होनराव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *