उर्दू ही शुध्द भारतीय भाषा असून त्यात हिंदी, अरबी, फारसी, संस्कृत व अन्य भारतीय भाषांचे अनेक शब्द समाविष्ट झाल्यामुळे उर्दू ही एक संपन्न व परिपूर्ण भाषा झाली आहे. उर्दू अदब, नजाकत, शिष्टाचार, आत्मीयता व आपुलकीचा मधुर संगम आहे व गंगा जमना सांस्कृतीची निशानी आहे. यासाठी खादिमाने उर्दू फोरमच्यावतीने उर्दू शिकण्याची संधी देण्यात आली आहे. उर्दूच्या वैशिष्ट्य म्हणजे उर्दू उच्चार खादिमाने उर्दू फोरम सोलापूर दरवर्षी उर्दूच्या प्रचारासाठी उर्दूत्तर भाषिकांसाठी मोफत उर्दू वर्ग आयोजित करत आहे. त्यात उर्दू लिहिणं, वाचणं व उर्दू उच्चार शिकवले जातात. दर रविवारी हे वर्ग तीन महिने चालविले जातात. या वर्गाचे उद्घाटन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे.
ज्यांना उर्दू शिकायचे आहे त्यांनी आपली नांवे को-ऑर्डिनेटर डॉ. शफी चोबदार (मो. 9890611766) व इक्बाल बागबान (मो. 9552529277) यांच्याकडे नोंदवावी व https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdcAnlLpCjej9edNyr7Il4SGFWiMvi8wAELxRyb2kRcYXX72Q/viewform या गुगल फॉर्म द्वारेपण भरावेत, असे आवाहन फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक हारुन करकम हे उर्दू वर्ग घेणार आहे.
Leave a Reply