Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सिनेसृष्टीचे गारुड सर्वांच्या मनावर असते . आपल्या आवडत्या स्टार चा वाढदिवस हा तर चाहत्यांसाठी जल्लोष असतो.  सोलापुरातील युवकांनी खिलाडी अक्षय कुमारच्या  वाढदिवसानिमित्त सोशल डिस्टन्स पाळून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यास चाहत्यांनी मोठा उस्फूर्त प्रतिसाद दिला.

सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात त्यांच्या चाहत्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. प्रत्येक वर्षी येथील सोलापूरकर ‘अक्षय’चा वाढदिवस साजरा करतात .

आज बुधवारी 9 सप्टेंबर रोजी खिलाडी ग्रुप फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते विडी घरकुल परिसरात याचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. 312 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. तेथे  सोशल डिस्टंसिंग पाळून वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला रक्ततदान शिबीर हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

अक्षय कुमारचा चाहत्यांनी स्वखर्चातून रक्तदात्यांना भेट म्हणून कुकर देण्याचे नियोजन केले होते. आज जवळपास 312 लोकांना ,ज्यांनी रक्तदान केले आहे. त्यांना कुकर चे वाटप करण्यात आले. आज बुधवारी रात्री व्हेज बिर्याणी करून गरजूंना वाटप करण्यात येणार आहे असे माहिती फाउंडेशनचे प्रमुख सुरेश जगलेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *