गावागावात वेळेवर कोरोना लस पोहोचण्यासाठी, केंद्राने राज्यांना पाठवला प्लान

नवी दिल्ली,दि.26 : कोरोना लस लवकरच वितरित केली जाईल. कोरोना लसीचे वितरण योग्य पद्धतीने व ग्रामीण भागापर्यंत होण्यासाठी केंद्र सरकार योजना तयार करत आहे. कोरोना लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

बुधवारी यासंदर्भात सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. ज्यानुसार सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स (Block Task Force) तयार करेल. यामुळे वॅक्सिन गावागावात पोहोचणार आहे. कोरोना लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार रणनीती बनवण्याच्या तयारीत आहेत.

ग्राऊंड लेव्हलपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून लवकरात लवकर ब्लॉक टास्क फोर्स बनवण्यास सांगितलंय. देशातील प्रत्येक शेवटच्या भागात या टास्क फोर्सच्या मदतीने कोरोना वॅक्सिनचे वाटप होईल. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच स्थानिकांची कामगिरी देखील महत्वपूर्ण असणार आहे.