ग्रामीण | आज कोरोनाचे निगेटिव्ह व्यक्ती 1866; तर नवे बाधित 162

आज बुधवारी दि.2 डिसेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 162 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 113 पुरुष तर 49 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 175 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2028 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1866 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 35 हजार 740 इतकी झाली आहे. यामध्ये 22,152 पुरुष तर 13,588 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1045 जणांचा मृत्यू झाला आहे यात 752 पुरुष तर 293 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 632 आहे .यामध्ये  1220 पुरुष तर 412 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 33 हजार 063 यामध्ये 20,180 पुरुष तर 12,883 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 2 तर ग्रामीण 1

बार्शी –नागरी 15 तर ग्रामीण 2

करमाळा –नागरी 8 ग्रामीण 20

माढा – नागरी 4 तर ग्रामीण 21

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 15

मंगळवेढा – नागरी 3 ग्रामीण 7

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 7

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 4

पंढरपूर – नागरी 18 ग्रामीण 16

सांगोला – नागरी 4 ग्रामीण 14

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी – 54 तर ग्रामीण भागात 108 असे एकूण 162 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.