Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

आज सोमवारी दि.30 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 152 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 85 पुरुष तर 67 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 120 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1144 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 992 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 35 हजार 482 इतकी झाली आहे. यामध्ये 21,971 पुरुष तर 13,511 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1040 जणांचा मृत्यू झाला आहे यात 748 पुरुष तर 292 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 754 आहे .यामध्ये  1298 पुरुष तर 456 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 32 हजार 688 यामध्ये 19,925 पुरुष तर 12,763 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 2 तर ग्रामीण 2

बार्शी –नागरी 5 तर ग्रामीण 1

करमाळा –नागरी 8 ग्रामीण 28

माढा – नागरी 3 तर ग्रामीण 19

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 33

मंगळवेढा – नागरी 2 ग्रामीण 3

मोहोळ – नागरी 2 ग्रामीण 4

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 9 ग्रामीण 23

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 7

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

आजच्या नोंदी नुसार नागरी – 32 तर ग्रामीण भागात 120 असे एकूण 152 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *