ग्रामीण | नवे 157 ‘पॉझिटिव्ह’ ; माढा,माळशिरस, सांगोला,पंढरपूरसह…

आज शुक्रवारी दि.20 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 157 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 98 पुरुष तर 59 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 92 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3555 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3398 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 33 हजार 791 इतकी झाली आहे. यामध्ये 20,885 पुरुष तर 12,906 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1004 जणांचा मृत्यू झाला आहे यात 720 पुरुष तर 284 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 279 आहे .यामध्ये  995 पुरुष तर 284 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 31 हजार 508 यामध्ये 19,170 पुरुष तर 12,338 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 13 तर ग्रामीण 3

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 4

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 21

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 38

मंगळवेढा – नागरी 3 ग्रामीण 8

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 6

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 14 ग्रामीण 27

सांगोला – नागरी 2 ग्रामीण 14

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3

आजच्या नोंदी नुसार नागरी – 33 तर ग्रामीण भागात 124 असे एकूण 157 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.