ग्रामीण रुग्णालय मंदृप येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

ग्रामीण रुग्णालय मंदृप येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिगंबर गायकवाड, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघमोडे, वैद्यकीय अधिकारी कंदलगाव डॉ.नलवडे, वैद्यकीय अधिकारी औराद डॉ. घोगरे उपस्थित होते.

यावेळी लसीकरणास उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांची मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विचारपूस करून मार्गदर्शन केले.