सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरूवारी ग्रामीण भागातील तब्बल 384 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 234 पुरुष तर 150 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 135 आहे. आज 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 2595 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2210 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 12 हजार 509 इतकी झाली आहे. यामध्ये 7636 पुरुष तर 4873 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 360 जणांचा मृत्यू झाला आहे यात 246 पुरुष तर 114 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 348 आहे .यामध्ये 2 हजार 172 पुरुष तर 1176 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 8 हजार 801 यामध्ये 5218 पुरुष तर 3583 महिलांचा समावेश होतो.