शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (रविवार) सध्याच्या एकूण परिस्थितीवर एक सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता एकूणच कंगना आणि त्यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तू-तू मै-मै सुरु आहे. त्यातच आज (रविवार) सकाळी-सकाळीच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्वीट (Tweet) केलं आहे. जे फारच सूचक आहे.
कंगना राणावतने सोशल मीडियावर मुंबईची तुलना थेट पाक व्याप्त काश्मीरशी (POK)केल्यानंतर तिच्यावर टिकेची झोड उठविण्यात आली आहे. त्याचवेळी संजय राऊत यांनी देखील तिला कठोर शब्दात सुनावलं होतं. मात्र यावरुन सोशल मीडियात थेट दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. ज्यात अनेकांनी कंगनाला सुनावलं आहे.
जय महाराष्ट्र!!! pic.twitter.com/vbqTMG0KQ5 — Sanjay Raut (@rautsanjay61) September 6, 2020 ” rel=”noopener” target=”_blank”> जय महाराष्ट्र!!! pic.twitter.com/vbqTMG0KQ5 — Sanjay Raut (@rautsanjay61) September 6, 2020
तर काही जणांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. याचदरम्यान आता संजय राऊतांनी आज केलेलं ट्वीट आता चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तुफानों का रुख मोड चुका हूँ…!’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. यावेळी या ट्वीटला त्यांना फक्त जय महाराष्ट्र! असं कॅप्शन दिलं आहे.
‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना…’ असं सूचक ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटचा रोख नेमका कुणाकडे आहे हे देखील आपल्याला ठाऊक आहे. मात्र आता त्यांच्या ट्वीटला अभिनेत्री कंगना राणावत काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली आहे.
Leave a Reply