Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज निधन झालं. रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही सिरीयल या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत.

त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेते अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये उत्कृष्टरित्या काम केलंय.
१९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे अविनाश यांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती.

त्यांच्या गाजलेल्या भूमिका…
त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या.
तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *