ठाकरे सरकार साधणार आज जनतेशी संवाद ; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी (८ नोव्हेंबर) दुपारी दीड वाजता जनतेशी लाईव्ह संवाद साधणार आहेत. पुनश्च हरिओम म्हणून अनलाॅक जाहीर झाल्यानंतर  राज्यातील एकूण स्थिती, काही गोष्टी राज्यात सुरू करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे.

काल शनिवारी दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरु करण्यात येणार आहेत. त्याशिवाय दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, याबाबत मुख्यमंत्री काही भाष्य करतात का ? याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.

 

शिवाय येत्या काळात राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री काही बोलतील का ? आगामी काळात दिवाळीचा सण असल्याने दिवाळीपूर्वी गर्दी करू नये याबाबत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला काय सूचना करणार ? याकडेही राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.