Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.

नरभक्षक बिबट्यामुळे करमाळा, माढा तालुक्‍यात दहशतीचे वातावरण होते. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले होते. बिबट्याला ठार मारण्याच्या दृष्टीने आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांनीही बिबट्याला पकडण्यासाठी व ठार करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. आज नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळाले.

अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *