मला मानणारे अनेकजण आहेत. मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. तरीही माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. दहा -पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत भाजप नेते एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली.
एकनाथ खडसे त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं आहेे.
पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अतिशय कष्ट घेऊन पक्ष उभारणी केली, असं खडसेंनी सांगितलं.
दरम्यान, गेली चाळीस वर्षे मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. तरीही माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे, असं खडसेंनी सांगितलं आहे.
Leave a Reply