सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कोविड – १९ कंट्रोल रूमचे कामकाज चालते. कंट्रोल रूम मार्फत नर्मदा हॉस्पिटल मधील कोविड POSITIVE रुग्णांचे बिलांचे लेखा परीक्षण करण्या करिता लेखाधिकारी म्हणून नेमणूक केलेले आहेत. धनराज पांडे, उपायुक्त व सनियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा परीक्षक सर्फराज मोमीन, झिन्जुरे व विष्णु गाडे यांनी बिलांचे लेखा परीक्षण केले असता एकूण ४३ रुग्णांचे ५,००,५४०/ – इतकी रक्कम तफावत आढळून आले. ज्यादा रक्कम आकारणी केलेल्या बिलांचे रुग्णास परत करण्याकरिता आयुक्त यांनी संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावली व तात्काळ रुग्णास परत करण्यास सांगितले.
त्यानुसार नर्मदा हॉस्पिटलने वरील ४३ रुग्णांचे चेक व यादी कोविड कंट्रोल रूमला सादर केले. त्यानुसार दि. २१ ऑक्टोंबर रोजी महापौर सौ. श्रीकांचना यन्नम व उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते सर्व रुग्णास चेक वाटप कार्यक्रम संपन्न झाला
कोणत्याही हॉस्पिटल ने जादा बिल आकारले तर कारवाई..
कोविड कंट्रोल रूमचे कामकाज कौतुकास्पद असून लेखाधिकारी यांनी अतिशय चांगले लेखा परीक्षण करून रुग्णांचे जादा झालेले बिल परत करून रुग्णांना दिलासा दिलेला आहे. तसेच कोणत्याही हॉस्पिटलने जर जास्त बिल आकारले असेल तर त्यावर कारवाई केली जाईल.
श्रीकांचना यन्नम, महापौर
वित्त विभागातील लेखा परीक्षक रुग्णांचे बिल तपासणीसाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नेमून महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण केला आहे. जर कोणत्याही रुग्णाचे जर तक्रार असेल तर त्यांनी कोविड कंट्रोल रूमला अर्ज करावे व प्रत्येक नागरिकांनी स्वत: ची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे.
धनराज पांडे उपायुक्त तथा सनियंत्रण अधिकारी
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखा परीक्षक सर्फराज मोमीन, आश्विन झिन्जुरे, विष्णू गाडे, तांत्रिक तज्ञ चंद्रकांत मुळे, उज्वला गणेश, सिद्धाराम मेंडगुदले, विनायक मोटे, समीर शेख व सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.