आज घटस्थापनेचा दिवस , देवीचे नवरात्र प्रारंभ !! आपल्या महिलांच्या उत्साहात , आनंदात भर पडावी म्हणून नऊ दिवस नऊ रंगाचे महत्व याची प्रथा पाडली गेली . मानवाला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे रंग . तान्हे मूल पण अनेक रंगसंगतीकडे पटकन पाहतात . पूर्वीच्या काळात साधी राहणी उच्च विचारसरणीला महत्व होते . लोक शिकून सवरून उद्योगधंद्याला लागत . आत्ताच्या आधुनिक काळात अनेक संशोधनाअंतर्गत शिक्षणाचे महत्व , सोयी सुविधा वाढल्या . साक्षरतेचे प्रमाण वाढले , ह्याचाच परिणाम लोकांचे राहणीमान सुधारले . अनेक नवनवीन प्रकार प्रचलित झाले , ते काहीही असो आपणही ह्या आधुनिकतेचा फायदा उठविला .
आज घटस्थापनेची पहिली माळ , आजचा रंग करडा ( ग्रे ) ह्याचे महत्व सांगावे किती….!!
आपल्या डोक्यावरचे छप्पर म्हणजेच ढग ह्याचा ही रंग करडा !! करड्या रंगाला साधारणपणे निवृत्तीचा काळ मानले जाते . पण त्याच्या कडे अनुभवाची खाण म्हणूनही पाहिले जाते .
करड्या रंगाचा उपयोग गृहसजावटी पासून ,वस्तू वगैरे सर्वत्र वापरला जातो . एखाद्याला आपण सहजच म्हणून जातो दगड आहेस तू पण हा दगड तर करडा रंगाचा असतो , ह्याचे महत्व तुम्ही जाणले का ? देवाची मूर्ती दगडाचीच बनवतात . एखादा कारागीर , शिल्पकाराचा तर हा अत्यंत आवडीचा रंग किंबहुना अनेक चित्रकार करड्या रंगाच्या वापराशिवाय आपले चित्रही पूर्ण करू शकत नाहीत . कृष्णधवल जुन्या
फोटोची आठवण म्हणून लोक या करड्या रंगात आपले फोटो काढून घेतात .
ग्रे किंवा करडा रंग हा बुद्धीचे प्रतीक मानले जाते . ह्याला विश्वासाचा रंग असा बहुमान मिळालाय !! सर्वसाधारणपणे शनिवारी ग्रे म्हणजेच करड्या रंगाची निवड नवरात्रात केली जाते . मूळ रंग आणि त्याचे महत्व हे देवीच्या आवडीचे म्हणून ओळखले जातात . ते काहीही असो एकाच रंगाची वस्त्रे परिधान करून एकोपा , एकजुटीचा संदेश मिळावा ह्यासाठी ही प्रथा प्रचलित आली .
ह्यावर कोणतीही टिकाटिप्पणी न करता आपण नव्या आशेला सामोरे जात , नव्याची कास धरत , सणाचा आनंद लुटूया !!
नवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
सौ. राजश्री भावार्थी