पुण्याचा मोटरसायकल चोर अटकेत; 4 दुचाकी जप्त

फौजदार चावडी पोलिसांनी पुण्याच्या दुचाकी चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून शहरातून चोरलेल्या 50 हजारांच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

शहरातून चोरीस गेलेली मोटारसायकल व आरोपी हा कोरेगाव पार्क, पुणे येथे असल्याची माहिती पोलीस हवालदार अल्ताफ शेख व त्याच्या पथकाला मिळाली. त्यानुसार फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने पुणे येथे जाऊन नागेश सखाराम वडतीले( वय 25,रा. गणेशनगर टेल्को रोड, भोसरी,पुणे) यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळील नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलीच्या कागदपत्र बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास पथकाने शिताफीने पकडले. त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही मुल्लाबाबा टेकडी या ठिकाणाहून त्वरित गेली असल्याची खात्री झाली. त्यास मोटरसायकल सह येथे आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने विविध गुन्ह्यांमधील चोरीस गेलेल्या 50 हजारांच्या चार विविध कंपन्यांच्या मोटरसायकली काढून दिल्या.