अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.
भेटी दरम्यान म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला आलेल्या पुरामुळे बोरी नदीवरील बणजगोळ आणि सातनदुधनी येथील कोल्हापूर पद्धतीचे दोन्ही बंधारे बोरी नदीच्या पुरामुळे वाहून गेले आहेत. तरी दोन्ही बंधारे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे,अशी मागणी माजी आमदार म्हेत्रे यांनी केली आहे.
दोन्ही बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी व वाहतूकीसाठी रस्ता बंद झाला आहे. येथील नागरीकांना रहदारीस अडचण येत आहे.
तसेच रब्बी हंगामासाठी कुरनूर धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात न थांबता पूर्णपणे वाहून जाणार आहे. त्यामुळे दोन्ही बंधारे त्वरित दुरूस्ती करण्याचे आदेश संबंधीत विभागाला जयंत पाटील यांनी
दिले आहेत.तसेच एकरुख उपसासिंचन योजनेची
द. सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील राहिलेली उर्वरित कालव्याची कामे करण्यासाठी रक्कम रूपये १०० कोटींची आवश्यकता आहे.तरी हि कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दयावे, अशी मागणी केली.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली होती तर आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आहे.
Leave a Reply