बदल घडतोय | तब्बल 28733 झाले बरे ; केवळ 1739 जणांवर उपचार सुरू

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होताना दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.3 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 138 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 75 पुरुष तर 63 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 105 आहे. यामध्ये पुरुष 65 तर 40 महिलांचा समावेश होतो .आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3086 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2948 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 404 इतकी झाली आहे. यामध्ये 19,414 पुरुष तर 11990 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 932 जणांचा मृत्यू झाला आहे यात 665 पुरुष तर 267 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 739 आहे .यामध्ये 1342 पुरुष तर 397 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 28 हजार 773 यामध्ये 17407 पुरुष तर 11326 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 9 तर ग्रामीण 10

करमाळा –नागरी 3 ग्रामीण 2

माढा – नागरी 2 तर ग्रामीण 12

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 11

मंगळवेढा – नागरी 1 ,ग्रामीण 4

मोहोळ – नागरी 4 ग्रामीण 7

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 6

पंढरपूर – नागरी 9 ग्रामीण 44

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 11

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

आजच्या नोंदी नुसार नागरी -29 तर ग्रामीण भागात 109 असे एकूण 138 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.