महेश हणमे /9890440480
सोलापूर हा विविध जाती- धर्म पंथ तसेच वेगवेगळ्या संस्कृती जपणाऱ्या नागरिकांचा वैविध्यपूर्ण नटलेला जिल्हा आहे. सोलापूर शहरातील पूर्व भागात पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. या भागातील नागरिक मोठ्या उत्साहाने तेलुगु संस्कृतीची जोपासना करतात. दिवाळीच्या कालावधीत तेलगू संस्कृतीतील बोम्मरिल्लू अर्थात भातुकलीचा खेळ मोठ्या उत्साहात मांडला जातो.
पूर्वभागातील कन्या या खेळामध्ये चांगल्याच रमलेल्या पहावयास मिळतात.
कुंभारी परिसरातील नवीन घरकुल येथील चिप्पा यांच्या कुटुंबातील प्रणोती ,यशश्री या दोन मुली तेलगू संस्कृतीतील बोम्मरिल्लू अर्थात भातुकलीच्या खेळामध्ये चांगल्यात रमलेल्या पहावयास मिळाल्या. या दोघींना आई पद्मावती यांनी मार्गदर्शन केले.
त्यांच्या या खेळात लहान-मोठी माणसेही उत्साहात सहभागी झाल्या आहेत. छोट्या पासून मोठी माणसे आवर्जून या खेळाला प्रोत्साहन देतात, यातील गंमत अनुभवतात. दिवाळीच्या कालावधीत घरोघरी पुर्वभागात या खेळाचे छोट्या मोठ्या प्रमाणात आकर्षक असे आयोजन होत असते.
खेळातून संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न
मुलींवर कौटुंबिक संस्कार व्हावे, घरकुलाची आवड निर्माण व्हावी,यासाठी बोम्मरिल्लू खेळ मांडला जातो. तेलगू संस्कृतीमध्ये मोठी विविधता आहे .आपली संस्कृती या खेळातून जोपासण्याचा मी प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे आमच्या घराजवळच्या मुस्लिम समाजातील कुटुंबात सुद्धा या पद्धतीने खेळ मांडला जातोय. भातुकलीच्या खेळातून मुलींच्या मनावर कौटुंबिक आणि मायेची भावना निर्माण होते.
पद्मावती चिप्पा