महाविद्यालय , हॉस्पिटलचा 100% जैन कोटा रद्द करावा,’यांनी’ केली मागणी…

सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांची माहिती

– महाविद्यालयात आम्ही नाराज व्यक्त करणारा फलक लावणार

– महाविद्यालय , हॉस्पिटलच्या 100% जैन कोटा रद्द करावा

सोलापुरातील शेठ गोविंद जी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल 100% जैन कोटा मंजूर आहे ही बाब शहरातील इतर समाजातील विद्यार्थ्यावर अन्याय करणारे आहे. तरी हा कोटा रद्द करावा अशा मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या शुक्रवारी सोलापूर शहरातील सम्राट चौक येथील शेठ गोविंद जी आयुर्वेदिक कॉलेज समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापुरातील शेठ गोविंद जी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल ही संस्था b.m.s. विद्यार्थ्यांसाठी सोलापुरात 198 विद्यार्थी क्षमता असलेली संस्था आहे. या संस्थेत पूर्वी इतर समाजातील सर्वांना प्रवेश मिळत होता. गरीबा बरोबर सर्व समाजातील विद्यार्थी डॉक्टर होत होते. मात्र संस्थेने शासनाचे अनुदान असताना केवळ जैन समाजासाठी शंभर टक्के आरक्षण जागा असलेली संस्था केली आहे. त्यामुळे हा निर्णय इतर समाजावर अन्याय होत आहे. राज्य सरकार व तसेच महाविद्यालयाने शंभर टक्के जैन कोठा रद्द करावा व सर्व समाजातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश द्यावा अशी आमची आग्रही मागणी आहे. त्याचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांना घेऊन समुद्र मी नाराजी व्यक्त करणारा फलक लावणार आहोत असेही माऊली पवार यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेस एनएसयूआयचे गणेश डोंगरे, भाऊसाहेब रोडगे, गणेश देशमुख, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड यासह विविध मान्यवर उपस्थित होते.