महिला दिनाच्या इतर सर्व कार्यक्रमांना फाटा; वीरशैव व्हीजन महिला आघाडीने गरीब विधवा महिलेस दिला वाटा
संसार उघड्यावर आलेल्या विधवा महिलेला स्वयंरोजगारासाठी महिलादिनी मिळाली मदत; वीरशैव व्हीजन महिला आघाडीचा मायेचा ओलावा
पतीच्या निधनानंतर पत्नीला मिळाले स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ; वीरशैव व्हीजन महिला आघाडीने दिला सोनालीला मदतीचा हात.
सोलापूर: महिला दिनानिमित्त वीरशैव व्हीजन महिला आघाडीकडून प्रतिवर्षी राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात देण्यात येऊन ती रक्कम एका गरीब विधवेस स्वयंरोजगारासाठी देण्यात आली.
वीरशैव व्हीजन महिला आघाडीकडून महिला दिनानिमित्त प्रतिवर्षी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, होम मिनिस्टर स्पर्धा व स्नेहमेळावा असे उपक्रम घेण्यात येतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. या कार्यक्रमावर खर्च होणाऱ्या 25 हजारांची रक्कम सोनाली कंटी या गरीब विधवा महिलेस स्वयंरोजगारासाठी देण्यात आली.
सोनाली कंटी यांचे पती शरणकुमार कंटी है आचारी काम करायचे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असत. मात्र 2 महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये त्यांचे अपघाती निधन झाले आणि त्यांची पत्नी सोनाली, मुलगी प्रिया (वय 7) व मुलगा सिद्धार्थ (वय 1) उघड्यावर आले.
घरची परिस्थिती गरिबीची, उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही अशा परिस्थितीत सोनालीने माहेरचा आसरा घेतला. दोन महिने माहेरी येऊन कसेबसे काढले. माहेरची परिस्थितीही तशीच तेंव्हा तिला स्वतःच्या व मुलांच्या भविष्याची चिंता सतावत होती.
अशावेळी तिने वीरशैव व्हीजन महिला आघाडीशी संपर्क साधला. सोनालीचे व तिच्या मुलांचे चरितार्थ चालवण्यासाठी तिला काहीतरी स्वयंरोजगार करण्यासाठी आर्थिक मदत करून यावर्षीचा महिला दिन साजरा करायचा असा निश्चय वीरशैव व्हीजन महिला आघाडीने केला. महिला आघाडीच्या सदस्यांनी यथाशक्ती योगदान देऊन 25 हजारांची रक्कम जमवली.
महिलादिनी त्या रकमेचा धनादेश निसर्गोपचार तज्ञ डॉ. सोनाली घोंगडे, डॉ. ज्योती मोकाशी, माधुरी बिराजदार, पल्लवी हुमनाबादकर, रेणुका सर्जे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
यावेळी श्री नाथ संस्थान औसाचे सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचेकडून सोनाली यांना एक महिना पुरेल इतके धान्याचे किट व 2100 रुपये मदत देण्यात आली.
यावेळी रेशमा निडगुंदी, वैशाली बिराजदार, प्रभावती दुदगी, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, विजय बिराजदार, सिद्धेश्वर कोरे, विनायक दूदगी आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : वीरशैव व्हीजन महिला आघाडीतर्फे सोनाली कंटी यांना धनादेश देताना डॉ. सोनाली घोंगडे, डॉ. ज्योती मोकाशी, माधुरी बिराजदार, पल्लवी हुमनाबादकर, रेणुका सर्जे, रेश्मा निडगुंदी, वैशाली बिराजदार,