सोलापूर,दि.२१ : उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथील एका महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवाजी लहू घोडके ( वय २१, रा. भोगाव ) या तरुणास न्यायालयाने जामीन मंजूर केला.
फिर्यादी ही बाळे येथून टमटममध्ये बसून घरी जात असताना आरोपी शिवाजी याने कागद कारखान्याजवळ मोटारसायकलवरुन येऊन टमटम अडवून फिर्यादीस खाली उतरविले व दीराच्या मुलीस सोलापूरला का पाठविले अशी विचारणा करुन दमदाटी केली. रस्त्याच्या बाजूच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर दुष्कर्म केले व चाकूचा धाक दाखवून बदनामीची धमकी दिली होती.
त्यानंतर त्याने महिलेला धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी दुष्कर्म केले. या प्रकरणी तालुका पोलिसात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने शिवाजी याचा जामीन व अन्य तीनजणांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲड. डी. एम. होसमनी, ॲड. संतोष होसमनी, ॲड. श्रध्दानंद पुजारी यांनी काम पाहिले.