सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते सुधाकर पंत परिचारक यांचे काल 17 ऑगस्ट रोजी रात्री पुणे येथे निधन झाले आहे. निधनाची वार्ता पसरताच परिसरात शोककळा पसरली आहे.
पांडुरंग परिवाराचे प्रमुख श्री.सुधाकरपंत परिचारक यांचे काल दि.17 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11.35 वाजता पुणे येथे दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे 84 वर्षे इतके वय होते.
कोरोना पार्श्वभूमीवर त्यांचा अंत्यविधी पुणे येथील वैकुंठभूमी येथे आज दि.18 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील असा निर्णय परिचारक कुटुंबियांनी घेतला आहे.
परिचारक हे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य होते. तर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवली होती.
5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. यामध्येच त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवार पासून परिचारक अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
ईश्वरी इच्छा पुढे कोणाचेही चालत नाही, ईश्वराने दाखविलेल्या मार्गावरच पुढे जावे लागते. शासकीय नियमानुसार 25 लोकात अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत. सर्वांनी धीर धरावा, संयम बाळगावा .
राजकारणातील संत प्रवृत्तीचा लोकनेता हरपला, पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मोजक्या पंचवीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आहेत ,
आमदार प्रशांत परिचारक