सोलापूर महानगरपालिका अंतर्गत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असुन पृथ्वी,वायू,जल, अग्नी,आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचीही अस्तित्व राहणार नसल्याने निसर्गाशी संबंधित पंचतत्ववर आधारित माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वसुंधराच्या प्रती आपली जबाबदारी म्हणून आज आयुक्त कार्यालय येथील मिटींग हॉलमध्ये उपायुक्त धनराज पांडे यांनी आपले अधिकाऱ्यांना हरितशपथ दिली.
यावेळी सहाय्यक आयुक्त सुनील माने,सहाय्यक आयुक्त पुष्पगंध भगत,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,नगरसचिव प्रवीण दंतकाळे,आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी, पंडित वडतीले,स्वप्नील सोलनकर,आर.कावळे, चंद्रकांत मुळे, सतीश कोळी,भारत गायकवाड चंदन फुले हे उपस्थित होते.
तसेच सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या कार्यालयात आपल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत हरती शपथ घेतली. तद्नंतर मा उपायुक्त धनराज पांडे यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयुक्त पी.शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त विजय खोरटे व इतर अधिकारी यांना स्वतः कडून एक झाड भेट देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व अधिकारी, नागरिकांनी शुभेच्छा देणेकरिता बुके ऐवजी एक झाड किंवा पुस्तक देऊन शुभेच्छा द्यावेत अशी विनंती केली.
Leave a Reply