भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले.
–
महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेले ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन👏🏼
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ ‘पोलीस शौर्य पदक’ आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणाऱ्या या कामगिरीसाठी सलाम. पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray hoisted the National Flag at his official residence Varsha on the occasion of Independence Day.