Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या गॅस सिलेंडरसह, बँकेच्या नियमांमध्ये बदल होत आहे. आजपासून राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. आता बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरू राहतील.

बँक ऑफ बडोदा आता पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी देखील शुल्क आकारणार आहे. ठाराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागणार आहे. लोन खात्यासाठी तीनपेक्षा जास्त वेळा रक्कम काढल्यास 150 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर बचत खात्यामध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळाच पैसे जमा करता येणार आहे. चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना 40 रुपये मोजावे लागणार आहे.

सिलेंडरसाठी असे आहेत नियम…

सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल होत आहे. सिलेंडरच्या घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे.सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार आहे. ओटीपी नसल्यास ग्राहकांना सिलेंडर नाकारलं जाणार आहे.

इंडेन ग्राहकांना आता 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करुन सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. तसेच रेल्वे देखील देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात आजपासून बदल करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *