MH 13 News Network
प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभाग प्रशासनाने हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सोमवार दि 1 मार्च पासून सोलापूर -पुणे -सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यंत धावणार असून या गाडीचे सर्व कोच आरक्षित राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, ही गाडी सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस म्हणजेच सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता सुटणार असून साडेदहा वाजता पुण्यात पोहोचणार आहे पुण्यातून ही गाडी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटणार असून रात्री दहा वाजता पुन्हा सोलापूर स्थानकावर येथे आगमन होईल ही गाडी कुर्डूवाडी दौंड स्थानकावर काही वेळ थांबेल.
या नियमांचे करावे लागेल पालन…
कोरोना संदर्भातील राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन या रेल्वेगाडीत व रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना करावे लागणार आहे.अन्यथा रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रवाशाला दंड करण्यात येईल .हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीनुसार ही गाडी सुरू केल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
सोलापूर-पुणे प्रवास चार तासांचा
दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामामुळे सोलापूर- पुणे या प्रवासातील अंतर कमी झाले आहे. सोलापूरहून पुण्याला जाणारी गाडी केवळ कुर्डूवाडी व दौंड या दोनच स्टेशनवर थांबा घेऊन अवघ्या चार तासात पुण्यात पोहोचणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होणार असल्याचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी सांगितले.