‘या’ तालुक्यात आजपासून पुन्हा जनता कर्फ्यू ; कोरोनारुग्ण वाढले 7

शेखर म्हेञे / माढा प्रतिनिधी :

माढा शहरातील वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज मंगळवारपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत जनता कर्फ्यू करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा मीनल साठे यांनी दिली.

माढा शहरात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काल नवीन 7 रुग्णांची वाढ झाल्याने शहरात एकूण रूग्ण संख्या 38 झाली आहे. काल केलेल्या 20 जणांच्या रॅपिड अॅटिजन टेस्ट मध्ये 7 रुग्ण आढळून आले यामध्ये संत सेना नगर 1 स्त्री, भांगे गल्ली 3 पुरुष 2 स्त्री1 तर शिवाजीनगर भागात 3 स्त्रियांचा समावेश आहे. सलग तीन दिवसात शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे पहिले 4 रुग्ण बरे झाल्यानंतर माढा शहर कोरोना मुक्त झाले होते परंतु शहरातील एका व्यापाऱ्याला कोरोनाेची लागण झाली.त्यानंतर हळूहळू माढा शहराची रुग्ण संख्या वाढत आहे. आजतागायत शहराची एकुण रुग्णसंख्या 38 झाली असून माढा तालुक्याची रुग्णसंख्या 300च्या उंबरठ्यावर आहे या पार्श्वभूमीवर माढा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच माढा शहरावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मंगळवारी दिनांक 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट हा 7 दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मीनल साठे यांनी दिली. यासंदर्भात काल सोमवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली या बैठकीत माढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, दादासाहेब साठे, माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने, गुरुराज कानडे, नाना साठे. आदीसह पदाधिकारी व अधिकारी यांचे मत जाणून घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

जनता कर्फ्यू च्या कालावधीत वैद्यकीय सेवा नियमित चालू असणार आहेत. तसेच या कालावधीत इतर सर्व दुकाने बंद असतील सकाळी 7 ते 9 व राञी 7 ते 9 दुध चालू असेल. पिण्याचे पाणी सकाळी 9 ते 12 या वेळेत चालू असेल. तरी सर्वांनी खबरदारी घेत आपली व आपल्या कुटुंबासह माढा शहराच्या सुरक्षेसाठी या जनता कर्फ्यूचे पालन करावे व सुरक्षित रहावे. असे अवाहन माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांनी केले.